राज्य मार्ग परिवहन महामंडळात तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या एकूण ७६ जागा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक/ अतांत्रिक पदांच्या ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ) अधिकारी पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व २ वर्ष अनुभव धारक असावा.
सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक/ तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ) पदाच्या ३० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमासह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व १ वर्ष अनुभव धारक असावा.
वरिष्ठ संगणित्र चालक (कनिष्ठ) अधिकारी पदाच्या ४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कॉम्पुटर/ आयटी डिप्लोमा किंवा समतुल्य आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता उत्तीर्ण असावा.
भांडार पर्यवेक्षक/ वरिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ) पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.कॉम./ बी.एस्सी./ ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल अभियांत्रिकी डिप्लोमा आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व २ वर्ष अनुभव धारक असावा.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (कनिष्ठ) अधिकारी पदाच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता उत्तीर्ण असावा.
कनिष्ठ अभियंता (विद्युत) (कनिष्ठ) अधिकारी पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विद्युत अभियांत्रिकी डिप्लोमा आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – २० मार्च २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.


साभार — https://nmk.co.in

Post a Comment

[blogger]
All Rights Resvered

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget