Share This App

Ads Here

Thursday, March 21, 2019

🤔 दहावी-बारावीनंतर पुढे काय?

🤔 दहावी-बारावीनंतर पुढे काय?


👉 दहावी आणि बारावी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातले मोठे टर्निंग पॉईंट. यानंतर पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहत असतो. तेव्हा निर्णय घेताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, त्यांच्यावर एक नजर टाकुयात..

▪ संधी
तुम्हाला एखाद्या विषयात फक्त आवड आहे म्हणून लगेच घाईत कोणता निर्णय घेऊ नका. त्यात पुढे करिअरच्या काय संधी आहेत, आर्थिक दृष्ट्या किती सक्षम होता येईल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मगच निर्णय घ्या.

▪ अनुभवींचा सल्ला
तुम्हाला सिनिअर असणारे जे कोणी असतील, ज्यांचे करिअर सुरु आहे अशा अनुभवींचा सल्ला अवश्य घ्या. कारण ते सुद्धा नुकतेच तुमच्यासारख्या फेजमधून गेले आहेत.

▪ निरीक्षण करा
सध्या आजूबाजूला कोणत्या आणि काय गोष्टी घडत आहेत त्यांचा अवश्य विचार करा. एखाद्या फिल्डमध्ये आत्ता जरी चांगले करिअर होऊ शकत असले, तरी जेव्हा तुमचे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा तसाच स्कोप असेल का याचा नीट विचार करा.

▪ मैत्रीमुळे निर्णय नको
एखादा मित्र किंवा मैत्रीण एखाद्या कोर्सला प्रवेश घेत असेल तर तुम्हीसुद्धा घेतलाच पाहिजे असे नाही. तुमच्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आवडीनिवडी आणि तुमच्या आवडीनिवडी यात खूप फरक असतो.

▪ आर्थिक बाजूंचा विचार करा
एखाद्या कोर्सला प्रवेश घ्यायचंच ठरवलं असेल तर मग भविष्यात त्या कोर्ससाठी येणाऱ्या खर्चाचा अंदाज घ्या आणि तो घरच्यांसोबत अवश्य डिस्कस करा.

💫 सर्व बाजूंचा व्यवस्थित विचार आणि अभ्यास करून निर्णय घ्या, कारण हा मोठा टर्निंग पॉईंट असतो.

No comments:

Post a Comment