Share This App

Ads Here

Thursday, March 21, 2019

उच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती


👉 उद्देश : अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरीत करणे (राज्य शासन पुरस्कृत योजना).

⚡ योजनेच्या प्रमुख अटी : अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराने माध्यमिक शालांत परीक्षा महाराष्ट्र राज्यातून उत्तीर्ण केलेली असावी, अर्जदाराच्या पालकांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.6.00 लाखापेक्षा जास्त नसावे, अर्जदार इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभार्थी नसावा, नूतनीकरणासाठी अर्जदाराने पुढील वर्षात प्रवेश घेतलेला असणे आवश्यक आहे

📝 आवश्यक कागदपत्रे : माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षेची गुणपत्रिका, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, अल्पसंख्याक असल्याबाबतचे स्वयंसाक्षांकीत प्रतिज्ञापत्र

💫 लाभाचा तपशील : सदर योजनेंतर्गत तांत्रिक व व्यावसायिक अभ्यासक्रम तसेच वैद्यकीय व अर्धवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रतिवर्ष रु. 25,000/- किंवा प्रत्यक्ष वार्षिक शैक्षणिक शुल्क यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्यात येते पात्र विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम E.C.S. /N.E.E.T द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये थेटपणे जमा करण्यात येते.

📍 कुठे संपर्क साधावा लागेल : वैद्यकीय व अर्ध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, मुंबई- 400 001 आणि तांत्रिक व व्यावसायिक शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीसाठी संचालक,तंत्र शिक्षण संचालनालय 3 महापालिका मार्ग, मुंबई- 400 001 यांचेकडे संपर्क साधावा.

🖥 अर्ज करण्याची पद्धत : सदर योजनेचा अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक व जाहिरात दरवर्षी संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय व संचालक वैद्यकीय शिक्षण संचालनालय यांचेमार्फत प्रमुख् वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द करण्यात येते. (शिष्यवृत्तीच्या नियमात किंवा आणखी काही बाबींमध्ये बदल असू शकतात, तरी वाचकांनी सदर माहितीची पुनश्च एकवार खात्री करून घ्यावी.)

No comments:

Post a Comment